अस्सल मुंबईकर आणि इंग्रजांचा खरा ऋणानुबंध होता. कारण,मुंबईवर मुसलमान किंवा मराठे यांपैकी कोणाचंच राज्य नव्हतं.एक तर मुंबईच नव्हती,ती मुंबई झाली साहेब आल्यानंतर.त्यामुळे मुंबईचे पहिले आणि अखेरचे राजे हे इंग्रजच.टिळक,गांधी या मुंबई बाहेरून आलेल्या लोकांनी उगीचच मुंबईकर आणि साहेब यांचे संबंध बिघडवले.अस्सल मुंबईकराला फोर्ट मधल्या जुन्या इमारती पाहून असं भडभडून येत…’काय साहेब होता.’
मुंबई हि मुंबईला मुंबई म्हणणार्यांचीच. मुंबई बाहेरून आलेल्या मराठी लोकांनी मुंबईची भाषा बिघडवली. अहो ‘चाय पिली’ असं म्हणायच्या ऐवजी ‘चहा घेतला’ म्हणाय लागले.काय हे..
– पु. ल. देशपांडे
(पुणेकर,मुंबईकर की नागपुरकर?)
(पुलं.ची भाषणे)
Leave a Reply