जिथून ते दृश्य सर्वात चांगले दिसेल अशी जागा पटकावण्याकरिता मुलांत ढकलाढकली आणि मारामारी सुरू झाली, आणि अर्थातच घारूअण्णांच्या भांडखोर आणि आडदांड पोरांनी इतर मुलांना केव्हाच त्या जागेवरून हुसकावले. माधवरावांचा दोन वर्षांचा शाम जेव्हा ती जागा सोडीना तेव्हा घारूअण्णांच्या बनीने थाड्दिशी त्याचे डोके गजावर हापटले. आणि बापडा शाम जेव्हा रडत घरात जाऊ लागला तेव्हा ती सारी फिदी फिदी हसली.
– गंगाधर गाडगीळ (किडलेली माणसं)