जे बोलावयाचे ते आपल्या मनास पूर्णपणे पटलेले असले पाहिजे व ते मनापासून, प्रामाणिकपणे बोलले पाहिजे, कवीला ज्याप्रमाणे अनुभवाची जोड लागते त्याप्रमाणेच वक्त्यालाही लागते. कवी व वक्ता यांच्यामध्ये फरक असा की वक्त्यास तर्कशास्त्राचाही अवश्य उपयोग करावा लागतो, तसा कवीस करावा लागत नाही. रंजन केले म्हणजे कवीचे काम झाले. पण वक्त्याला तर्कशास्त्र व रंजन या दोन्ही गोष्टी सांभाळाव्या लागतात. तात्पर्य, श्रोत्यांची अंतःकरणे वश करून घेणे हे ज्याअर्थी वक्ततृत्त्वाचे मुख्य कार्य आहे त्याअर्थी वक्त्याचे बोलणे स्वानुभूतीतूनच निर्माण झालेले असले पाहिजे.
– विष्णूशास्त्री चिपळूणकर (वक्तृत्त्व)