ज्या जगात तो वावरतो, त्या जगात कोणतेच मूल्य स्थिरावणे शक्य नव्हते. अशा मूल्यव्यवस्था कोसळलेल्या वातावरणात मूल्य शोधण्याची धडपड तो करू इच्छितो. पहिल्यांदा तर तो या वातावरणात गांगरून, बावरूनच जातो. आपण इतरांच्या दृष्टीने हास्यास्पद ठरू नये अशी त्याची धडपड चालू आहे. प्रत्येकाच्या प्रतिष्ठेच्या कल्पना निराळ्या असतात. कॉलेज जीवनात प्रतिष्ठा मिळवावयाची असते ती भोवतालच्या मित्रांकडून.
– नरहर कुरुंदकर (धार आणि काठ)