त्या अद्भुताच्या तंद्रीत आपण भटकत असायचो. पण किती चाललो ते मात्र आपल्याला समजायचे नाही. आपण थिएटरात जायचो, पण सिनेमा पाहायचो नाही; हॉटेलात जायचो, पण खायचो नाही; लोकांना आपण दिसायचो, पण लोक आपल्याला दिसायचे नाहीत. तेव्हा समुद्रकिनार्यावर एकत्र बसून आपण जे सूर्यास्त पाहिले ते किती भव्य होते ! तेव्हा आकाशातल्या लाल रंगाची छटा तुडुंब भरलेल्या सागराच्या हेलावणार्या पृष्ठभागावर जशी उतरत असे तशी आपल्या उत्कट भावनांत देखील प्रतिबिंबित होत असे.
– गंगाधर गाडगीळ (तलावातले चांदणे)
Leave a Reply