त्याची ठेंगणी काळी दणदणीत मूर्ती भलतीच विनोदी दिसायची. काळ्याला इंग्रजी अजिबात यायचं नाही. पण कुणी इंग्रजीत याच्याशी शिष्ट बोललं, की हा निवडून ठेवलेले मोठमोठ्ठे कठीण शब्द वापरून त्याचे फेंफें करायचा. मग खोलीत येऊन मला सांगायचा, साला आपल्यापुढे कोण इंग्रजी चालेल ज्यादा ? साल्याचा बेडूक करून टाकला. बेडूक केला हे खास. अमक्या सतारच्या पैलवानानं अमक्या पंजाबी मुसलमानाचा बेडूक केला. परीक्षेचा बेडूक करून टाकीन. ह्या पोरीचा बेडूक करावा. काल मेसमध्ये शिरा होता, शिर्याचा पार बेडूक केला-काळ्याचं सगळं खास.
– भालचंद्र नेमाडे (कोसला)
Leave a Reply