त्याच्या गळ्याला साखळी बांधून तो त्याला आपल्याबरोबर फिरायला नेई. बॉबी साखळीला मधून मधून ओढ घेत असे. विश्रामला वाटे ‘‘नको, त्याच्या गळ्याला फास लागेल.’’ तो ‘बॉबी’ म्हणून रागाने ओरडे. बॉबी अधिकच ओढ घेई. विश्राम त्या मुक्या प्राण्याच्या यातना समजून शेवटी त्याला उचलून घेई. विश्रामच्या हातात काही वेळ स्वस्थपणे पालखीतील शंकराचार्यांसारखा बसून जगाकडे पाहणारा बॉब लगेच काही वेळाने धडपडू लागे. विश्रामने रागावून त्याला उभ्यानेच खाली टाकावे. बॉबला त्याचीही फिकीर नव्हती. षडि*पूंना जिंकलेल्या संताप्रमाणे निर्विकारपणे तो पुन्हा चालू लागे. आईची करंगळी धरून चालण्यापेक्षा गाड्याघोड्यांना न जुमानता आपला मार्ग छोट्या छोट्या दोन पायांनी दुडदुड धावून आा*मू पाहणार्या पराक्रमी मुलासारखी बॉबची अवस्था कधी कधी होई.
– विभावरी शिरूरकर (विश्राम)
Leave a Reply