दादबाला दोन ‘आया’. सख्खीचं नाव ‘नाबदाबाय’, दुसरीचं ‘सईबाय’. सईला मूलबाळ नव्हतं. दादूवर तिची आभाळाएवढी माया…. दादबाला तिघं भावंडं…. थोरली चिधाबाय अन् धाकली सुगंधा…. हा मधला…. म्हातारपणी नवसानं झाला म्हणून बापानं लाडानं नाव ठेवलं ‘गजानन’. पूर्ण नाव ‘गजानन राघू सरोदे’. आता ‘दादू इंदुरीकर हे कसं ?’ तर आवडीनं सारी त्याला ‘दादा’ म्हणत, त्याचं पुढे ‘दादू’ झालं…. आणि तमासगीर मंडळी आडनाव सोडून गावाचं नाव लावतात. कारण ‘जन्माची नाळ ज्या मातीत पुरली, त्या मातीचा अभिमान तमासगीरांनी ठेवावा’ असा रिवाज. म्हणून ‘दादू इंदुरीकर’ झाला.
– प्रभाकर ओव्हाळ (कहाणी वगसम्राटाची दादू इंदुरीकर)
Leave a Reply