दुपारी डबा खात असताना माझ्या डोळ्यांसमोर पहाटेचं चित्र आहे. स्टोव्हजवळ बसून माझी सिधू माझ्यासाठी डबा तयार करीत आहे. बाजूला सरिता निजली आहे. आदल्या दिवशीच्या भांडणामुळं नि सार्या रात्रीच्या जागरणामुळं तिचा चेहरा सुकला आहे; ह्या भांडणातच मी महिनाभर गावाला जातोय या विचारानं ती दुःखी झाली आहे. प्रत्येक घासामागं माझ्यासाठी कणाकणानं झिजणार्या माझ्या बायकोचे श्रम आहेत, ही जाणीव मला छळीत आहे.
– शं. ना. नवरे (सर्वोत्कृष्ट शन्ना)
Leave a Reply