निर्मला मुलांकडे पाहून हसली. ‘‘चल’’ म्हणून मग मेहेंदळे फाटकाच्या दिशेनं चालू लागले. फूटपाथवरून चालता चालता ते निर्मलाकडे पाहत अनपेक्षित थांबले नि एखादी पोज घ्यावी तसे स्तब्ध, काहीसे ताठ झाले नि म्हणाले, ‘‘काय ? वाटतो का मी म्हातारा ? कशी केली बॉलिंग ? या मुलांकडे, तुझ्याकडे पाहिलं की वाटतं, उत्साह आणला ना, की नुसत्या उत्साहानं आपण खूप तरुण होतो, नाही ?’’ त्यांनी डोळे मिचकावले.
— मोनिका गजेंद्रगडकर (भूप)