प्रत्येक व्यक्ती हे एक गूढ असते. त्याच्या मनात परस्परविरूद्ध प्रवृत्ती नांदत असतात आणि हे लक्षात घेतल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीचे खरेखुरे दर्शन घडविता येत नाही. एखाद्या घटनेच्या भोवर्यात सापडलेल्या व्यक्तीचे स्वभावविशेष आपल्या लक्षात येतात ते त्या व्यक्तीच्या कोणत्या क्रिया-प्रतिक्रिया दिसून आल्या, त्या तशाच का झाल्या याचा शोध घेतला म्हणूनच !
— भालचंद्र फडके (भूमिका, मराठी लघुकथा)