भट हे बुद्धिमान विद्यार्थी होते. वकिली नि डॉक्टर अभ्यासक्रमातील त्यांची फक्त शेवटची परीक्षा राहिली होती. पण सावरकरांप्रमाणे त्यांचीही बी.ए.ची पदवी सरकारने काढून घेतली होती. नि त्यामुळे एल.एल.बी. च्या अंतिम परीक्षेला त्यांना बसता येईना. बी. ए.ची पदवी परत मिळावी म्हणून खटपटीत ते आता मुंबई विद्यापीठाचे उफलगुरु असलेल्या न्या. चंदावरकरांकडे गेले. तर त्या ‘शहाण्याच्या कांद्याने’ (हे भटांचेच शब्द आहेत.) तसे करता येत नाही म्हणून हात झाडले.
— वि. श्री. जोशी (पूर्णाहुती आणि वाताहात)