1702

थिएटरच्या बाहेर गर्दीत एक माणूस जवळ जाऊन एका महिलेला म्हणाला, `माझ्याबरोबर कॉफी प्यायला येता ?’
एका अनोळखी माणसाने एवढ्या गर्दीत आपल्याला असे आमंत्रण द्यावे याचा त्या महिलेला संताप आला. त्यावर तो म्हणाला, ‘मॅडम रागावू नका. येथे असलेल्या दोन एकशे महिलांमधील सर्वांत सुंदर, स्मार्ट आणि तरुण मुलीला हुडकून तिच्याबरोबर कॉफी प्यायची अशी आम्हा मित्रांची पैज लागली होती म्हणून केवळ विचारले.’
असं म्हणताच लाजून ती तरुणी म्हणाली, ‘इश्य, मग त्यात काय.. चला की फक्त कॉफी तर प्यायचीय ना ?’