एक व्यापारी आपल्या दुकानाचा इन्शुरन्स पॉलिसी काढून घेतो. ज्या दिवशी पॉलिसी घेतो त्याच दिवशी दुकानाला आग लागते. त्याचे बरेच नुकसान होते. तेव्हा इन्शुरन्स कंपनीला संशय येतो पण पुरावा नसल्यामुळे त्यांना ते सिद्ध करता येत नव्हतं.
तेव्हा पुढील ओळी लिहून त्यांनी समाधान मानलं – ‘प्रिय महाशय, तुम्ही सकाळी पॉलिसी घेतली आणि दुकानाला आग दुपारपर्यंत लागू शकली नाही तेव्हा कृपया याचं कारण समजू शकेल काय ?’