1748

दोन म्हातारे मित्र खूप क्रिकेट वेडे असतात.. एक मित्र मरत  असतो तेव्हा दुसरा त्याला सांगतो … ‘तू मेल्यावर स्वर्गात क्रिकेट आहे का ते कळव.’

काही दिवसांनी मेलेला मित्र  दुसर्‍याच्या स्वप्नात आला आणि म्हणाला …’एक  चांगली बातमी आहे आणि एक वाईट … कोणती आधी सांगू ?

दुसरा मित्र  म्हणाला ‘चांगली आधी’

मेलेला मित्र म्हणाला .’आनंदाची गोष्ट म्हणजे स्वर्गात क्रिकेट आहे… वाईट बातमी म्हणजे …बुधवारच्या मॅच मध्ये तुला बोलिंग  करायची आहे’