मानववंश शास्त्रज्ञांनी विभिन्न मानवी समुदायांचा अभ्यास करून मानवी समाजाची सहा धार्मिक प्रतिकांमध्ये विभागणी केली आहे. वृक्ष, लिग, सर्प, अग्नि, सूर्य आणि पितर ही ती सहा प्रतीके होत. मानवाने त्याची धार्मिक उपासना सुरू केली. त्यामुळेच वृक्षाची पूजा होऊ लागली. वृक्षाप्रमाणे नाग किवा सर्पपूजा अतिशय प्राचीन आहे. ती केवळ प्राचीन नाही, तर जगातल्या अनेक देशात व्यापक स्वरूपात अस्तित्वात आहे. जगातल्या सर्व प्रदेशात कोणत्या ना कोणत्या स्वरूपात सर्पपूजा प्रथा रूढ होती, असे दिसून येते. इजिप्तमध्ये आढळलेल्या पुरावशेषांमध्ये सर्पाकृती कोरलेल्या सापडलेल्या आहेत.
– डॉ. द. ना. भोसले. (लोकपरंपरेतील नाग)