मी नेहमी ‘यात्री’ मानसासंबंधी बोलतो. ईश्वर आपल्याजवळ आहे. त्याला दूर लोटून आपण ईश्वर-दर्शनासाठी बद्रीकेदारला जातो. तिथे गेल्यावर म्हणतो, आता काशीयात्रेला जाऊ. तिथून रामेश्वरला. म्हणजे, जो ईश्वर जवळ आहे त्याला दूर ढकलत राहतो. जसे हे ‘यात्री-मन’ असते, तसेच एक ‘ध्यानी-मन’ ही असते. भगवंत आत-बाहेर सर्वत्र आहे. डोळ्यांना दिसतो आहे, पण आपण त्याला डोळे बंद करून पाहू इच्छितो. डोळ्यासमोरून ईश्वराला बाजूला सारून त्याची आत रवानगी करतो. वस्तुतः आत-बाहेर असा भेद नाही.
– विनोबा (महागुहेत प्रवेश)