या परमत्त्वाच्या ठायी काही सामर्थ्ये वास करतात. स्वरूपाला मर्यादा घालणे, आत्मसंकोच साधणे, परिवर्तन पावणे व प्रसंगी स्वतःमध्येच विलीन होणे. परमतत्त्व हे व्यक्त आणि अव्यक्त अशा दोन्ही अवस्थेत नांदू शकते. ते तसे शब्दातीत, वर्णनातीत आहे. पण शब्दांच्या मर्यादा पत्करून त्याला ‘सत्-चित्-आनंद’ स्वरूप म्हणता येईल. त्याच्याशी संवाद साधण्याचे मार्ग म्हणून कर्म, भक्त, ज्ञान, योग यांचा अवलंब करता येईल. निदिध्यास, विवेकपूर्ण शरणागती, अन्य अवडंबरांचा व उपाधींचा अव्हेर हे साधनेचे मार्ग होते.
– प्राचार्य शिवाजीराव भोसले (देशोदेशीचे दार्शनिक)