रावणाचा नाश आणि रामराज्याची स्थापना या काही एका प्राचीन महाकाव्यातल्या घटना नव्हेत. वाङ्मयाच्या मर्यादेतून निसटून त्या कधीच्याच संस्कृतीसंचिताच्या विशालतेत सामावल्या गेल्या आहेत. या भारतीय भूमीवर दुष्ट संहाराची आणि विश्वमंगलाची तहान लागलेल्या कितीकांनी कधी वैयक्तिक तर कधी सामूहिक पातळीवर या घटनांच्या पुनरावतरणाची स्वप्नं पाहिली आहेत.
– अरुणा ढेरे (अर्ध्या वाटेवर…)