वडिलांच्या पाठोपाठ आईचा मृत्यू झाला. संकटे येऊ लागली म्हणजे एकटी दुकटी येत नसतात. कै. दे. ना. टिळक चरित्रात लिहितात. ‘पुनः प्रश्न आला प्रेतक्रियेचा. श्रीनिवासने बाबापुता करून कशी तरी दोन माणसे उभी केली. तिसरा श्रीनिवास व चवथा खांदेकरी स्वतः रमाबाई ! रमाबाई ठेंगण्या असल्याने त्यांना तिरडीचा कोपरा आपल्या डोक्यावर ठेवावा लागला व त्यामुळे अधिक भार त्यांच्यावर पडत होता.
– सौ. ताराबाई साठे (अपराजिता रमा)