V-0024

हाताच्या पाच बोटांसारखे आपण राहिले पाहिजे. त्यातले कुठलेच बोट दुसर्‍यासारखे नसते. तरीही एखादी वस्तू उचलताना ही पाचही बोटे एकत्र येऊन ती वस्तू उचलतात. खरे तर बोटे पाचच आहेत, पण ती एकत्र येऊन हजारो कामे करतात. त्यांच्या यशाचे गमक त्यांच्या एकत्वात आहे.
— आचार्य विनोबा भावे