विन्स्टन चर्चिल यांच्या ठिकाणी ही कला काहीशी आनुवांशिक आलेली होती. विन्स्टन यांच्या आईला चित्रे काढण्याचा नाद होता. या कलेकडे ओढले गेल्यानंतर त्यांनी हळूहळू खूपच प्राविण्य संपादन केले. त्यांच्या कल्पनाशक्तीला आवाहन करणारी, त्यांच्या ठिकाणच्या सौंदर्यदृष्टीला प्रोत्साहित करणारी अशी ही कला ठरली. गोल्फ खेळताना, पाण्यात डुंबताना, डोंगर चढताना विन्स्टन सहसा एकटे नसत. या वेळी अखंड बडबडही चालू असे. फक्त चित्रकला हा एकच त्यांचा असा नाद ठरला तेव्हा ते बडबड करीत नसत. शांत असत.
– वि. ग. कानिटकर (विन्स्टन चर्चिल)