दोन प्रवासी धबधबा पाहत होते.
“वा ! काय सुंदर !” पहिला प्रवासी म्हणाला. त्यावर दुसरा प्रवासी म्हणाला, “हो, पण पाणी किती वाया जाते
आहे. पाण्याची किंमतच लोकांना कळत नाही.”
“तुम्ही पर्यावरणवादी आहात की जलसाक्षरतेचे काम करता ?”
“नाही हो माझा दुधाचा धंदा आहे.” दुसरा प्रवासी म्हणाला.