एका खेडेगावातल्या शाळेचा वार्षिक निकाल हेडमास्तरांनी जाहीर केला. दुसर्या दिवशी ते भाजी आणण्यासाठी गावातल्या एकुलत्या एक भाजीवालीकडे गेले.
“काय भाव बटाटे?” त्यांनी भाजीवालीला विचारले.
“आठ रुपये किलो.”
“काल तर तु मला चार रुपये किलोने दिले होतेस.”
“हो, काल माझा पोरगा नापास झाला नव्हता.”