बंड्या अमेरिकेत एका मल्टिनॅशनल कंपनीत कामाला होता.
तिथं त्यानं एक पोपट विकत घेतला.
तो रोज सकाळी बंड्या उठेस्तोवर म्हणायचा,
” सर, प्लीज वेक-अप. इट्स टाईम टू गो टू ऑफिस!”
बंड्याची बदली पुण्याला झाली.
त्यानं सदाशिव पेठेत भाड्यानं घर घेतलं.
आता पोपट म्हणतो,
” बाजीराव, उठा आता… लोळत पडायला तुमच्या तीर्थरूपांनी इस्टेट नाही कमवून ठेवलेली!”