बनावट नोटा तयार करणा-या चोरांना एकदा एक चौदा रुपयांची नोट दहा रुपयांच्या बंडलात सापडली . जवळच्या खेड्यात लोकांना बनवावं म्हणून तिथल्या एका दुकानदाराला ती नोट देऊन त्यांनी सुटे मागितले. तो दुकानदार हो म्हणाली आणि आत गेला. बाहेर दोघेही कसं बनवलं म्हणून खुषीत होते. इतक्यात तो दुकानदार सातच्या दोन नोटा घेऊन आला.