उचिताचा काळ। साधावया युक्ति बळ। आपुले सकळ। ते प्रसंगी पाहिजे।।
नेम नाही लाभ हानी। अवचित घडती दोन्ही। विचारोनी मनी। पाहिजे ते प्रयोजावे।।
काळ उचित, अनुकूल असला, तरी त्याचा लाभ उठविण्यासाठी आपण आपली शक्ती आणि युक्ती वापरायला हवी. कोणत्या वेळी यश मिळेल आणि केव्हा अपयश पदरात पडेल, याचा काही नियम नसतो. योगायोगाचा प्रभाव नेहमीच असतो. तेव्हा साधनाचा उपयोग विचारपूर्वकच करायला हवा.
— संत तुकाराम
Leave a Reply