धर्मशाळेतली अगदी कोपर्यातली खोली वॉचमनने उघडून दिली. भीषण अंधाराची ती खोली त्याला गूढ वाटली म्हणून त्या प्रवाशाने वॉचमनला विचारले. “या खोलीत काही गडबड नाही ना,”त्यावर तो म्हातारा वॉचमन म्हणाला,” गेल्या चाळीस वर्षात तरी काही घडलेले नाही. चाळीस वर्षापुर्वी एक यात्रेकरु खोलीत गेला पण त्याला बाहेर पडताना कुणी पाहिले नाही इतकेच!”