देव सूर्याच्या किरणासारखा आहे. नम्र, सभ्य अतिथी सारखा. तो तुम्हाला भेटण्यासाठी दारात उभा असतो. बंद दारातुन सूर्याची आत येऊ शकत नाहीत. पण दार थोडे जरी किलकीले केले की प्रकाश किरणांचा झोत आत येतो. सारे घर उजळून टाकतो. श्रध्येने मनाचे दार किलकीले झाले की तो तेजस्वी परमात्मा तुमच्या मनात असाच प्रवेश करतो आणि अवघे जीवन तेजस्वी, दिव्य बनवतो.
— आचार्य विनोबा भावे
Leave a Reply