‘‘पहाटे साडेचारला बाबा उठले. त्याबरोबर त्यांची मंडळीही पटापट उठली. प्रातर्विधी सर्वांनी आटोपले. बाबा मला म्हणाले, ‘‘तुमच्याकडे खराटे जेवढे असतील तेवढे लौकर आणा !’’ माळ्याकडे चारपाचं खराटे होते. ते बाबांनी आपल्या सर्व मंडळींना वाटले. एक स्वतः हातांत घेतला, आणि बंगल्याभोवतालचे आवार झाडण्याचे काम त्यांनी सुरू केले. मी लाजेने अर्धामेला झालो. ऐंशी वर्षांच्या बाबांनी माझ्या बंगल्याचे आवार झाडावे अन् मी काय करावे ? मी चमत्कारिक मनःस्थितीत तसाच बाबांच्या मागेमागे हिडत राहिलो. बाबांचे झाडण्याचे तंत्र मात्र ‘रामबाण’ आहे. त्यांनी आमच्या दोन्ही गड्यांना जवळ बोलावून कसे झाडावे याचे प्रात्यक्षिक दिले.’’
— गो. नी. दाण्डेकर (श्रीगाडगेमहाराज)
Leave a Reply