‘‘सामुदायिक जलभरण दिसतंय-’’ बाबूकाकांच्या बोलण्यात कोकणी खवटपणा होता. ‘‘हो ! आमच्या चाळीत पाणी भरण्याचे काम पुरुषवर्गाकडे आहे !’’ ‘‘छान !’’ कल्पलताबाई उद्गारल्या, ‘‘पण तुम्ही सामुदायिक शिवण ठेवले नाही का ?’’ स्वतःच्या विषयाकडे वळत त्या म्हणाल्या. ठेवणार होतो. पण त्यासाठी सर्वांनी एकाच तर्हेची पोलकी घालावी ही योजना पास करताना, एकाच मापाची ही उपसूचनाही पास झाली; आणि उपसूचनेची अंमलबजावणी करणे अवघड झाल्यामुळे सारीच योजना तहकूब केली आहे.’’
— पु. ल. देशपांडे (बटाट्याची चाळ)
Leave a Reply