‘‘हे बघ, काशीराम ! तू काय हवें तें कर…पण आज मारलंस तसं बायकोला पुन्ना कधी मारूं नकोस. ती एक दिवस मरून जायल…नाय मारलंस तरी ती आतां फार दिवस जगणार नाय… तुझ्या पोटी माझ्या आब्बाससारखा पोरगा हाय. तो उघडा पडेल…त्याची काय तरी चिता कर… दारू पी… पण कमी पी आन् घर सोडू नको. बायकोला, आईला विसरू नको–हें बघ, या दुनियेत इन्सानियत ही एकच चीज शाबूत ठेवावी माणसाने, मग जग बुडाले तरी चालेल…अरे आपली बायको-आपली आई आनि आपले बालबच्चे यांना हैराण करून कुणाला आजवर सुख मिळालं हाय…झोपडपट्टींतल्या गंदीत राह्यला त्याचा दिल त्या गंदीत बुडून उपयोगी नाय…’’
— मधु मंगेश कर्णिक (माहीमची खाडी)
Leave a Reply