‘एक तर तुझ्यासारख्या बुद्धिमान माणसानं असा मठ्ठ प्रश्न विचारू नये. बुद्धिभ्रम झाल्याचं हे लक्षण आहे. कारण असं आहे की आपण ही सिस्टिमच अशी निर्माण केली आहे की, मध्यवर्गीय माणसाला नुसत्या सर्व्हायव्हलसाठी देखील अनेक ढोंगं करावी लागतात, स्वतःला फसवावं लागतं, मित्रांच्या पाठीत खंजीर खुपसावे लागतात. फॅमिलीला दगा द्यावा लागतो, समाजाला टांग मारावी लागते… करून-सवरून स्वतःशी कबूल करीत ज्याला अपरिहार्यपणे हे सगळं करावं लागतं, त्याला ढोंगी म्हणता येणार नाही. पण हे कळूनही जो स्वतःशी प्रामाणिकपणे कबूल करीत नाही. तो मात्र हिपोक्रॅटिक’
— अरुण साधू (ग्लानिर्भवति भारत…)
Leave a Reply