‘विडी’ हा एक मला छळणारा ज्वलंत प्रश्न आहे. माझ्या जीवनातले अनेक धागे जोडले गेले आणि तोडलेही गेले. एके काळी कुशाभाऊशी माझं सूत होतं. पण त्याला प्रमोशन मिळाल्यावर त्याच्या वृत्तीत बदल पडला. त्यामुळं आमचं सूत तुटलं. कायकिणी गोपाळरावांची माझी मैत्री साध्या पातळीवरून ते आध्यात्मिक पातळीवर न्यायला लागल्यावर त्यांना सोडून द्यावं लागलं. असे अनेक मित्र आले आणि गेले. पण विडीचा आणि माझा (लाल) धागा अतूट आहे. कधी कधी मात्र मला उपरती होते. किबहुना, ती व्हावी याविषयीच्या इतरांच्या प्रयत्नांना यश येतं आणि हातातोंडाशी आलेली विडी मी गमावून बसतो.
— पु. ल. देशपांडे (असा मी असामी)
Leave a Reply