आपल्या जन्मापासून मृत्यू हा आपला सोबती. पण त्याचा विचार करायला मुंबईसारख्या शहरात आपल्याला सवड असतेच कुठं ? आपण वृद्ध झाल्याखेरीज तो आपल्या आसपासही फिरकणार नाही अशी आपण आपली एक सोयिस्कर गैरसमजूत करून घेतलेली असते. पण इथं बॉर्डर रोडला येऊन दाखल झालं की लक्षात येतं, हा आपला सोबती आता चक्क आपल्या हातात हात घालून आपल्याबरोबर चालू लागला आहे. आज दुपारी रारंग ढांगात सतलजवर पूल बांधत असताना माझा पाय घसरला. सरळ पात्रातच पडायचो, पण गर्डरवर लोंबकळत राहिलो. केवळ काही क्षण. पण तो एकेक क्षण केवढा प्रदीर्घ.
— प्रभाकर पेंढारकर (रारंग ढांग)
Leave a Reply