उतरल्यावर मी पायी पायी हिडायला सुरूवात केली. हिडताना होतलान नावाचा एक तरूण विद्यार्थी मला पुस्तकाच्या दुकानात भेटला. त्याला इंग्रजी येत होतं. त्याच्याशी दोस्ती झाली. बराच काळ तो माझ्याबरोबर हिडत होता. त्याला केरिंची-पेकन बारू प्रवासाबद्दलची माहिती विचारली, मी २५ हजार रूपये दिल्याचं सांगितलं. तो हसला. ‘तुमच्याकडून फार पैसे घेतले. आठ हजार रूपयेच घ्यायला हवे होते.’ होतलाननं सांगितलं. होतलानच्या मदतीनं मी पेकन बारूचा नकाशा समजून घेतला. मुख्य बस स्टँड कुठं आहे, तिथं कशी गावोगावची तिकिटं मिळतात, पेकन बारूत मुख्य बस मार्ग कोणते आहेत इ. गोष्टी मी त्याच्या मदतीनं पाहिल्या. पेकन बारूमध्ये कुठूनही कुठंही जायचं असलं तरी एकच तिकिट असे. एक हजार रूपये. बरीच माहिती मिळाली.
— निळू दामले (इंडोनेशिया स्त्रिया लोकशाही)
Leave a Reply