खिळ्याला अडकविलेली पाटी, कोनाड्यांत पाने विस्कळीत होऊन पडलेले पुस्तक आणि पेन्सिल हे सारे साहित्य गोळा करून तिने मुलाच्या हाती दिले. ते घेतांना त्याचे चिखलाने भरलेले हात तिच्या दृष्टीला पडले आणि कपाळाला आठ्या घालून ती म्हणाली, ‘‘हात धू जा, आडावर जाऊन. घाणेरडा कुठचा !’’ दिनू जास्तच चिडला. हात कशाला धुवायचे ? थोडे वाळल्यावर जोराने चोळले की सारा चिखल आपोआप जाईल निघून. काय तरीच आईचे ! मग दाणदाण पाय आपटीत तो परसदारी गेला. दोन्ही हात स्वच्छ पाण्याने भरलेल्या डोणेत बुचकळून त्याने चड्डीला पुसले. परत आईपुढे येऊन तो ओरडला, ‘‘आणि टोपी कुठाय माझी ?’’
— व्यंकटेश माडगुळकर (शाळा)
व्यंकटेश माडगुळकर (शाळा). खिळ्याला अडकविलेली पाटी, कोनाड्यांत पाने विस्कळीत होऊन पडलेले पुस्तक आणि पेन्सिल हे
मला पाठवा
मला खुप आवडते