तांग राजघराण्याच्या राजवटीत बौद्ध धर्मग्रंथांची भाषांतरे ठेवण्यासाठी ही वास्तू बांधली-अशा कल्पनेने की युवान ष्वांग हा त्या मंदिराचा मुख्य धर्मोपदेशक होईल म्हणून ! (तेव्हा त्याच नाव भिख्खू त्रिपिटक असेही होते.) ही वास्तू इ. स. ६५२ मध्ये बांधून पूर्ण झाली. तिला पाच मजले होते आणि त्यांची एकूण उंची जवळ जवळ दोनशे फूट होती. ह्या वास्तूलाही काळाच्या भक्ष्यस्थानी पडावे लागले-पुन्हा वास्तूची उभारणी केली. ती इ. स. ७०१ ते इ. स. ७०४ च्या दरम्यान-त्यावेळी त्या वास्तूला दहा मजले बांधले गेले. पुढे शिआनच्या परिसरात वारंवार युद्धे झाली. आणि हा पॅगोडा नष्टप्राय स्थितीत आला.
— चंद्रकांत वर्तक (लूयू-चीन)
Leave a Reply