आले कां पत्रकार कोणी ?
आले कां पत्रकार कोणी ? आले कां रे कॅमेरे ? शेतकर्याचे पुसतो आंसू झटपट घ्या व्हीडिओ ‘खरे’. – सुभाष नाईक
आले कां पत्रकार कोणी ? आले कां रे कॅमेरे ? शेतकर्याचे पुसतो आंसू झटपट घ्या व्हीडिओ ‘खरे’. – सुभाष नाईक
ट्रॅक्टरवर बस, खोटं हस मी फोटो काढतो तो जाहिरातीसाठी धाडतो ; मग भलेही रड ढसाढस. – सुभाष नाईक
नेतेगणहो, तुम्ही ठेवा तुमच्या स्कीम्या तुम्हांनजिक शेतकर्याला, तुमची ‘सेवा’ तापदायकच ठरे खचित. – सुभाष नाईक
भाकरीला कधी न लोणी लावा डोळ्यातलं पाणी गुपचुप ओली करून खावा अन् आनंदात र्हावा . – सुभाष नाईक
भलाथोरला पाऊस भलीमोठी नासधूस नको ‘पेपरां’ची चूष गपगार, डोळे पूस. – सुभाष नाईक
बियाणं हायब्रीड आहे त्याचं हाय् यील्ड् आहे शेतकर्याला असो, नसो व्यापार्यांना त्याची नीड् आहे – सुभाष नाईक
‘GM’ बियाणानं केला घोळ वापरा किंवा नका वापरू, होतो पुरता बट्ट्याबोळ – सुभाष नाईक
कर्जाचा उंचउंच डोंगर अन् व्याजाचे तीक्ष्ण कडे बँकेची खडबडीत नोटिस, संचित हें कृषिवलाकडे. – सुभाष नाईक
बलरामाच्या हातीं नांगर श्रीकृष्णाच्या हातीं चाक शेतकर्याच्या हातीं दोन्ही तरि त्याला सर्वांचा धाक – सुभाष नाईक
Copyright © Marathisrushti.com 1995-2022 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Interpole Technologies | Smart Solutions