शेर प्रीतीचे – तव मुखा असती दिली
तव मुखा असती दिली उपमा चंद्रम्याची सखे तेज जर असतें तया अवसेसही तुजसारखे . – सुभाष स. नाईक (शेर प्रीतीचे)
तव मुखा असती दिली उपमा चंद्रम्याची सखे तेज जर असतें तया अवसेसही तुजसारखे . – सुभाष स. नाईक (शेर प्रीतीचे)
मीच हेवा करितसे माझ्या मनाचा सर्वदा दूर सखिपासून मी, तिजजवळ तें असतें सदा . – सुभाष स. नाईक (शेर प्रीतीचे)
शांत रात्रीं सुंदरी ती दिसतसे कधिकधि मला धाडसानें एकदा मी ‘जवळ ये’ म्हटलें तिला हांसली, आली पुढे, मी रूप जवळुन पाहिलें घाम फुटला दरदरुन मज, बघुन उलटी पावलें ।। – सुभाष स. नाईक (वाह्यात रुबाईयात)
बेत वारंवार – “हृदयाची व्यथा सांगिन तिला“ पण बसे, जातां पुढे दांतखीळ प्रत्येकदा – सुभाष स. नाईक (शेर प्रीतीचे)
आंत ती जातांच, आतुर तिजकडे तो धावला लागलिच लगटुन, तिच्या पदरास झोंबूं लागला हर्षली तीही, तयाला थांबवी नच मुळिच ती पाळला-कुत्रा असे तो सुंदरीला प्रिय अती ।। – सुभाष स. नाईक (वाह्यात रुबाईयात)
दिसतसे कित्येक वेळां ती मला टीव्हीवरी प्रथम कुतुहल, ध्यास नंतर लागला मज अंतरीं राहवेना, पोचलो स्टुडिओमधे मी टीव्हीच्या समजलें, टीव्हीतली माशी असे अगदी खरी ! – सुभाष स. नाईक (वाह्यात रुबाईयात)
हात त्यानें लावला सर्वांपुढे अंगा तिच्या लागला सोडूं निर्या त्या सुंदरीच्या साडिच्या तो ज़रा ना लाजला, तीही मुळी ना लाजली स्टाफ तो शोरूममधला, ती “डमी” काचेतली ।। – सुभाष स. नाईक (वाह्यात रुबाईयात)
स्वाद ओठांचा सखीच्या चाखतो गर्दीत मी ती जिथें बाळास चुंबी, तेथेंच ठेवी ओठ मी . – सुभाष स. नाईक (शेर प्रीतीचे)
जातांच मी, ती मजकडे आतूर होउन धावली लागलिच मजला मिठी सर्वांसमोरच मारली चुंबनें कांहीं भराभर वर्षवी ती मजवरी गोड मोठी तीन वर्षांची असे ती छोकरी ! – सुभाष स. नाईक (वाह्यात रुबाईयात)
कबुल आहे, घेतलें चुंबन तुझें, झाला गुन्हा दे सजा, मी सिद्ध आहे चुंबना-आलिंगना . – सुभाष स. नाईक (शेर प्रीतीचे)
Copyright © Marathisrushti.com 1995-2022 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Interpole Technologies | Smart Solutions