वाह्यात रुबाईयात – फक्त ती मजला हवी
फक्त ती मजला हवी, बाकी मला कांहीं नको अधिर मी, पुसलें तिला, ‘होशील माझी बायको?’ ‘चालेल’ ऐकुन हर्षलो मी, ती असें वदली पुढें – ‘चालेल मज पेद्रू कुणीही, फक्त तूं मजला नको’ ।। – सुभाष […]
फक्त ती मजला हवी, बाकी मला कांहीं नको अधिर मी, पुसलें तिला, ‘होशील माझी बायको?’ ‘चालेल’ ऐकुन हर्षलो मी, ती असें वदली पुढें – ‘चालेल मज पेद्रू कुणीही, फक्त तूं मजला नको’ ।। – सुभाष […]
मन तिचें वळवायला युक्ती अशी मी काढली रोज तिजला काव्यमय मी प्रेमपत्रें धाडली शेवटी फळलीच की गंधित गुलाबी शृंखला दूत वरला पोरिनें, जो पोचवी पत्रें तिला ! – सुभाष स. नाईक (वाह्यात रुबाईयात)
होऊनिया आतूर मी गेलो तिला भेटायला तात्काळ दरवाजा तिनें लावून की हो घेतला लावला होता तिनें कां, टाळण्यांसाठी मला ? लावला होता तिनें, कवटाळण्यांसाठी मला !! – सुभाष स. नाईक (वाह्यात रुबाईयात)
ध्यानामधिं राहूं दे दोस्ता, नश्वर ही सगळी मत्ता क्षणार्धात जाईल संपुनी, हातीं जें आहे आत्तां चंचल आहे लक्ष्मी, जाते निसटुन ती कळण्यांआधी कशास मग मागसी गड्या तूं वाढवून महागाईभत्ता ? – सुभाष स. नाईक (वाह्यात […]
ही फायर वॉल आहे संरक्षणासाठी. जशी वॉल ऑफ् चायना. पण, फायटर अन् फायर-फायटर असतातच ना ! ते भिंत पार करून घुसतातच अन् हल्ला करतातच कंप्यूटरवर. – सुभाष स. नाईक
भरधाव वेगात धावत होती मागे पुढे इकडे तिकडे , सारथी सांगेल तशी. हाय रे ! हाय रे ! कांहीं कळायच्या आधीच crash झाली कंप्यूटरची disk. – सुभाष स. नाईक
कोणी ही सज़ा दिली त्याला ? की त्यानं स्वत:च दिली स्वत:ला ? कोणी hang केलं या कंप्यूटरला ? – सुभाष स. नाईक
अल्झायमर झाला त्याला आदेश एकही समजेना संभाषणही उमगेना स्वत:ची आयडेंटिटीही विसरून गेला. अल्झायमर झाला कंप्यूटरला. – सुभाष स. नाईक
थोरांनो, पोरासोरांनो गुन्हे शंभर तुम्हाला माफ झटून सारे जर नेहमी ठेवाल पृथ्विला साफ – सुभाष स. नाईक
क्रौंचवधानें, वाल्मींकींच्या कवी मनातिल जागा होई लक्ष जीव वधतसे प्रदूषण मना मिटुन दर मानव घेई – सुभाष स. नाईक
Copyright © Marathisrushti.com 1995-2022 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Interpole Technologies | Smart Solutions