मुक्तक-शिळा अहिल्या उठतां, बोले
शिळा अहिल्या उठतां, बोले – ‘कां ही नवीन शिक्षा ? मला गोठविल आतां प्रदूषण शाप बरा त्यापेक्षा ! – सुभाष स. नाईक
शिळा अहिल्या उठतां, बोले – ‘कां ही नवीन शिक्षा ? मला गोठविल आतां प्रदूषण शाप बरा त्यापेक्षा ! – सुभाष स. नाईक
रात्र न झाली जयद्रथा ही नसे अर्जुना, सूर्यग्रहण रवि न झाकला सुदर्शनानें नभास व्यापी तीव्र प्रदूषण – सुभाष स. नाईक
तेंच, वासवी अमोघ शक्ती चक्रहि तेंच सुदर्शन तेंच, शक्त ब्रह्मास्त्र भयानक नांव नवीन , ‘प्रदूषण‘ – सुभाष स. नाईक
तेंच, तीव्रतम चक्रीवादळ तें, राक्षसी त्सुनामी मृत्युदूत सामावत सारे एक ‘प्रदूषण‘ नामीं – सुभाष स. नाईक
सदाच मी फोडतो फटाके कारण कांही शोधुन. हरण जगाच्या करतें स्वास्थ्या ध्वनि- अन् धूर-प्रदूषण – सुभाष स. नाईक
फक्त दिवाळीलाच कशाला घरीं सफाई करतां ? टाका झाडुन रोज प्रदूषण स्वच्छ जीवनाकरता – सुभाष स. नाईक
मानव डरकाळत रोजच – ‘करुं खात्मा प्रदूषणाचा‘ पण प्रदूषणा हें ठाउक – नर तर वाघ मोहर्रमचा – सुभाष स. नाईक
एकामागुन एक सटासट फटके मारी निज अंगावर प्रदूषण-आसुड स्वत:स मारत ‘कडकलक्ष्मी‘ कां बनलाहे नर ? – सुभाष स. नाईक
वाद्य वाजवित, नाचत ‘खेळे‘ पसरे होळी रंग रे परसा-परसामधें प्रदूषण नाचे सर्वांसंग रे – सुभाष स. नाईक
नव-उत्सव नित साजरे करा दिन पाळा रोज सणाचे भोगुन घ्या; होणार बळी जग राक्षस-प्रदूषणाचे – सुभाष स. नाईक
Copyright © Marathisrushti.com 1995-2022 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Interpole Technologies | Smart Solutions