मुक्तक-जीव द्यायला विहीर नको
जीव द्यायला विहीर नको नच रूळ आगगाडीचे आहेत सज्ज दारात दूत यमराजा प्रदूषणाचे – सुभाष स. नाईक
जीव द्यायला विहीर नको नच रूळ आगगाडीचे आहेत सज्ज दारात दूत यमराजा प्रदूषणाचे – सुभाष स. नाईक
एअर-कंडीशंड मोटार पसरते विषारी धूर आंत कॉर्पोरेट-सरदार बेफिकीर, स्वप्नीं चूर ! – सुभाष स. नाईक
घेउनही प्राण, न थांबे ही प्रदूषणाची व्याधी मरण्याआधी, निज-संस्कृतिची बांधुन टाक समाधी – सुभाष स. नाईक
लागली आग घरट्यांना होणार पिलांचें काय ? विझविणें प्रदूषण-अग्नी हा अंतिम जगा उपाय ! – सुभाष स. नाईक
प्रपातातुनी मुक्त उधळले शुभ्र नि फेनिल शत अमृतकण जलबिंदूंना परि नच कळलें विषाक्त भरलें त्यांत प्रदूषण – सुभाष स. नाईक
घरट्याच्या आरोग्यासाठी फिल्टर करुनी उकळालच जळ पण, अन्नीं रोखाल कशी, जी प्रदूषणानें केली भेसळ ? – सुभाष स. नाईक
खिडकीत बसवला पंखा की, अपुरी हवा घरात अन् सुसाट वायु प्रदूषित घुसतो जोसात घशात – सुभाष स. नाईक
लावलास निजहस्तानें निजमुखा, नरा, तूं डाग ! आतां तरि प्रदूषणाला कायमचें पुसण्यां, जाग ! – सुभाष स. नाईक
शेयर्सचा बाजार भयानक ! चढतो-पडतो, पडतो-चढतो बघा, प्रदूषण किति आश्वासक ! नित आलेख तयाचा चढतो ! – सुभाष स. नाईक
प्रगत-अप्रगत जगा, प्रदूषण सर्वत्रच सारखेच पोळी मात्र, प्रगत जी असतीं राष्ट्रें तींच भाजुनी घेती पोळी – सुभाष स. नाईक
Copyright © Marathisrushti.com 1995-2022 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Interpole Technologies | Smart Solutions