मुक्तक-धक्के खाउन देह कोंबला
धक्के खाउन देह कोंबला लोकलमधल्या खिडकीजवळी तरी, बोंबला! घुसुन प्रदूषण खिडकीतुन श्वासाला जाळी – सुभाष स. नाईक
धक्के खाउन देह कोंबला लोकलमधल्या खिडकीजवळी तरी, बोंबला! घुसुन प्रदूषण खिडकीतुन श्वासाला जाळी – सुभाष स. नाईक
गर्दी लोकलमधें खचाखच श्वास घ्यायला त्रास तासभर नवल न तें; जगिं प्रदूषणानें श्वास घ्यायला त्रास जन्मभर – सुभाष स. नाईक
हायकू हिरवासा बांबू इवलासा पक्षी म्हणतोय्, इथें किती थांबू ? – सुभाष स. नाईक
हायकू कांहीं पानं पिवळी कांहीं पानं हिरवी अन् कुठे कुठे इवलीशी पालवी. – सुभाष स. नाईक
हायकू पानगळीचा मोसम कांहीं पानं तगली, जगली कांहीं झडली, पाचोळा बनून पडली. – सुभाष स. नाईक
हायकू तृषिताची तहान घोटभर पाण्यानं भागत नाहीं. पण मृत-संहीवनी म्हणून अमृताचा एक थेंबही पुरतो त्यासाठी रांजणभर लागत नाहीं. – सुभाष स. नाईक
हायकू पिवळे दिवे, पांढरे दिवे, रंगीतही हवे ? अंधार हटवायला कुठलाही चालतो दिव्यांच्या इंद्रधनुष्याची गरजच काय ? – सुभाष स. नाईक
झोपडपट्टी पाण्यात बुडली मंत्र्यांच्या ताफ्यानं लाल दिव्यांच्या गाड्यांमधून दुरूनच न्याहाळली स्वत:चे फोटो काढवून घेतले अन् ‘आलबेल’चा संदेश तत्परतेनं दिल्लीला पोचवला. (आलबेल : All Well) – सुभाष नाईक
आला पाऊस पाऊस घुसमटून मेला एकएक mouse छतापर्यंत डुबलं house पुरी फिटली टूरिस्ट पाहुण्याची हौस. (डुबलं : बुडालं) – सुभाष नाईक
सरीवर सरी कोळतायत् गटारांना पूर आलाय् अन् झोपड्यांमधल्या डोळ्यांनाही.. – सुभाष नाईक
Copyright © Marathisrushti.com 1995-2022 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Interpole Technologies | Smart Solutions