आली झड आली झड
आली झड आली झड . काळ्याशार ढगांची झुंड ओततेय् घागरीमागून घागर . तरी भरेना धरतीचं tub जरी बुडलं आगर – सुभाष नाईक
आली झड आली झड . काळ्याशार ढगांची झुंड ओततेय् घागरीमागून घागर . तरी भरेना धरतीचं tub जरी बुडलं आगर – सुभाष नाईक
हायकू डॉक्टरची वेटिंग-रूम सर्टिफिकिटं हारीनं टांगलेली पेशंटस् ची गर्दी, चहूंकडे पांगलेली ( हारीनं : रांगेनें ) – सुभाष स. नाईक
घों घों वारा पावसाचा मारा हिरवं हिरवं वन गरीब माणसांचं मात्र मरण – सुभाष नाईक
तशाच, अगदी तशाच, या लहान-लहान-कवितांच्या कड्या. वाचेवाचेतो, कळायच्या आधीच, त्या जातात सरून, पहातां-पहातां, चुटपुट लावून – सुभाष नाईक
उंदीर, माकडं, पक्षी, टोळ, गुरं-ढोरं, भुरटे चोर, हे सर्व कमी पडतात, म्हणून की काय, साहेब-बाबू-पाटकरी मोंढ्यावरले व्यापारी शेतकर्याच्या पिकावर घालतात धाड त्यांच्यापुढे त्याचा काय पाड ! ते सगळे सुटलेले असतात मोकाट, अन् याचं तर संपलेलं […]
शेतकर्याकडे असतो लहाऽनसा वावराचा तुकडा एक घास खाईतो, कळायच्या आधीच, चावतां-चावतां, त्याचं साऽरं अन्नधान्य जातं संपूऽन – सुभाष नाईक
‘पिकतं तिथं विकत नाहीं’, असं म्हणतात. पण, लहरी निसर्गामुळे शेतकर्याच्या मळ्यात कांहीं पिकतऽच नाहीं मग तो विकणार काय, दगडं ? – सुभाष नाईक
करूं नको देवाचा धावा कर धावा तू नेत्यांचा कर्ज, व्याजही माफ कराया खरा फायदा लीडरचा – सुभाष नाईक
सारी खोपी गेली झोपी कास्तकार, पण, तळमळतो पीक नाशतां, कर्ज ग्रासतां देवहि गरिबाला छळतो – सुभाष नाईक
इरिगेशनचे ‘रावसाहेब’ इरिगेशनचे पाटकरी देवच ते ; जरि वारकरी मी कां जावें पंढरपुरी ? – सुभाष नाईक
Copyright © Marathisrushti.com 1995-2022 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Interpole Technologies | Smart Solutions