वर्षानुवर्षाचा हिशेब ठेवून वागल्यामुळे जगण्यातला आनंद मात्र जातो

एक कंजूस माणूस आपल्या पत्नीला घेऊन बागेत फिरायला जातो. तो दिवस त्यांच्यासाठी महत्त्वाचा असतो. कारण त्यांच्या लग्नाचा पंचविसावा वाढदिवस असतो. कामाच्या व्यापात पंचवीस वर्ष कशी निघून गेली हे कळलेही नाही पण आजचा दिवस लक्षात ठेवून […]

ठकाशी व्हावे महाठक

एकदा एक शिकारी शिकार करण्यासाठी जंगलात जाळे लावतो. त्या जाळ्यात एक वाघ अडकतो. जाळ्यातून सुटण्यासाठी तो खूप धडपड करत असतो. तेवढ्यात एक लाकूडतोड्या तेथून जाताना वाघाला दिसतो. वाघ त्याला पाहून वाचवा, वाचवा म्हणून ओरडतो. पण […]

‘मी’पणा संपल्यावरच तुम्ही परमेश्वराशी एकरूप होता. स्वतःला ‘मी’ म्हणवून परमेश्वरापासून आपण आपल्याला विभक्त करून घेतो

एक साधू एकदा आपल्या गुरुच्या दर्शनाला जायचं म्हणून गुरुच्या झोपडीसमोर येऊन उभा राहिला. पण त्यांच्या झोपडीचे दार बंद होते. एकदम दार उघडून झोपडीत कसे शिरायचे म्हणून गुरुंची परवानगी घेण्याकरिता त्याने दार वाजवले. थोडावेळाने आतून विचारणा […]

दुसर्यावेळी तिच चूक पुन्हा करतो तो मूर्ख असतो

घनदाट जंगलात एक वाघ आणि लांडगा रहात होते. दोघं एकमेकांचे मित्र होते. वाघ रोज शिकार करून आणायचा आणि लबाड लांडगा त्यावर पोट भरायचा. एकदा वाघ आजारी पडला तेव्हा लांडग्याला नाईलाजाने शिकारीसाठी जावे लागले. शिकारीसाठी धावपळ […]

शिक्षेनी नाही तर क्षमा केल्याने चूक सुधारत असते

काशीला एक विद्वान पंडित रहात असत. त्यांचा मोठमोठ्या ग्रंथांचा अभ्यास होता त्यामुळे साहजिकच त्यांच्याकडे जुन्या-नव्या ग्रंथांचा खूप मोठा संग्रह होता. त्यात एक अत्यंत प्राचीन असा तत्त्वज्ञानावरील दुर्मीळ ग्रंथ होता. पंडितांच्याकडे कधी सल्लामसलतीसाठी तर कधी धार्मिक […]

आपण सदैव बांधलेले आहोत अशा भ्रमात न राहता मुक्त होऊन जगले पाहिजे

काही बेलदार लोक म्हणजे गाढवाचे व्यापारी व्यवसायानिमित्त आपली गाढवं घेऊन दुसर्या गावाला जात होती. संध्याकाळी त्यांनी एका झाडाखाली आपला मुक्काम ठेवला. सकाळपासून गाढवं बरोबरीने चालत होती पण आता रात्रभरात ती इकडेतिकडे जाऊ नयेत म्हणून त्यांना […]

माणसाची पारख त्याच्या रूपावरून नाही तर गुणांवरून करावी

बुद्धिदत्त राजाने आपल्या कर्तृत्वाने आपले साम्राज्य बरेच वाढवले होते. लढणार्या आपल्या शूर सेनापतीचे आणि सैनिकांचे त्याला अतिशय कौतुक आणि अभिमान होता. त्याच्या बरोबरीने त्याच्या राज्यातल्या आणि परराज्यातल्या विद्वानांबद्दल त्याच्या मनात अतिशय आदराची भावना होती. त्यामुळे […]

गर्वाचे घर खाली

तुकारामाच्या नावेतून अनेक लोक अनेकदा प्रवास करीत. या गावाहून त्या गावाला जाण्यासाठी तासभर तरी लोक त्याच्या नावेत असत. दिवसाकाठी अनेक प्रवाशांना तो नावेतून घेऊन जात असे. त्यामुळे मानवी स्वभावाच्या अनेक छटा त्याने पाहिल्या होत्या. एक […]

माणूस हा सवयीचा गुलाम आहे

आठवडी बाजारातून मासोळ्या विकून परत आपल्या गावी जायला काही कोळिणींना बराच उशीर झाला. एवढ्या अंधारात गावी कसं जाणार म्हणून रस्त्यालगत असलेल्या शेतमळ्यातील झोपडीजवळ त्या विश्रांतीसाठी थांबल्या. त्यांना झोपडीबाहेर बसलेलं पाहून तेथील माळी म्हणाला, ‘‘आता खूप […]

मन निर्मळ असेल तर त्यात भर घालणारी प्रत्येक गोष्ट निर्मळच होते

‘‘भिक्षां देही’’ म्हणत एक साधू महाराज मंगलाबाईंच्या घरासमोर येऊन उभे राहिले. त्यांचा आवाज ऐकून मंगलाबाई भिक्षा घेऊन आल्या. त्या फार अस्वस्थ दिसत होत्या. बाहेर येऊन साधू महाराजांना म्हणाल्या, ‘‘महाराज, मी फार अस्वस्थ आहे मला काहीतरी […]

1 12 13 14 15