संस्कृत मधले झकास जोक्स
मास्तर :
कर्मण्येवाधिकारस्ते मां फलेषु कदाचन।।
बंड्या याचा अर्थ सांग?
बंड्या:
करमत नसल्यामुळे
राधिका रस्त्यावर
फिरत असते,
कदाचित तिला फळ घ्यायची असतील !
मास्तर :
बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन! याचा अर्थ काय ?
बंड्या : माझे अनेक जन्म झाले आहेत पण तुझा जन्म चार जूनला झाला आहे !
मास्तर : …बरं आता सांग…
“दक्षिणे लक्ष्मणोयस्य वामे तु जनकात्मजा” याचा अर्थ काय ?
बंड्या : दक्षिणेकडून लक्ष्मण आला आणि म्हणाला… जनका… तुझी मजा आहे !
मास्तर – बंड्या, याचा अर्थ सांग
” हे पार्थ त्वम् चापि मीम: चापि…!”
बंड्या – हे अर्जुना, तू (शांतपणे) चहा पी, मी पण पितो.
मास्तरांनी चहा कायमचाच सोडला.