v-327

वेदांची अक्षरे पोथीत सापडतात, अर्थ जीवनात शोधायचा असतो. — आचार्य विनोबा भावे

V-536

शेतात बी पेरुन त्यावर माती टाकली की बी दिसत नाही. तरीही ते आत विकसित होत असते. तीन दिवसांनंतर जेव्हा त्याला अंकुर फुटतो तेव्हा कळते की आंत किती सूक्ष्म क्रिया होत होत्या. त्याचप्रमाणे प्रार्थना, ध्यान आणि […]

V-546

देव सूर्याच्या किरणासारखा आहे. नम्र, सभ्य अतिथी सारखा. तो तुम्हाला भेटण्यासाठी दारात उभा असतो. बंद दारातुन सूर्याची आत येऊ शकत नाहीत. पण दार थोडे जरी किलकीले केले की प्रकाश किरणांचा झोत आत येतो. सारे घर […]

V-525

दोन संकल्पांच्या मधल्या काळात किंवा दोन श्वासांच्या मधल्या काळात आपल्या शुद्ध स्वरुपाचा अनुभव येतो. दोन श्वासांच्या मधली अनुभूती प्राणांमध्ये होते. आणि दोन संकल्पांच्या मधली अनुभूती महत्वपूर्ण आहे. या ध्यानात लीनता आहे. तन्मयता आहे. यालाच खरे […]

V-513

घोडा म्हणजे विज्ञान आहे आणि लगाम म्हणजे आत्मज्ञान आहे. म्हणून विज्ञानाला आत्मज्ञानाची जोड नसेल तर जगाचा संहार होईल आणि जोड दिली तर या पृथ्वीवर वैकुंठ उतरेल. — आचार्य विनोबा भावे

V-540

झोपताना मेंदूला कुलूप लावले पाहिजे. गाढ आणि नि:स्वप्न निद्रेत मनुष्य आपल्या मूळ स्वरुपात लीन होतो. फक्त अज्ञान शिल्लक असते, म्हणून परत येतो. अज्ञान नष्ट झाले, तर मनुष्य एकदम ईश्वरापाशी पोहोचेल, मुक्त होईल. जितकी गाढ, नि:स्वप्न […]