‘आलबेल’चा संदेश
झोपडपट्टी पाण्यात बुडली मंत्र्यांच्या ताफ्यानं लाल दिव्यांच्या गाड्यांमधून दुरूनच न्याहाळली स्वत:चे फोटो काढवून घेतले अन् ‘आलबेल’चा संदेश तत्परतेनं दिल्लीला पोचवला. (आलबेल : All Well) – सुभाष नाईक
झोपडपट्टी पाण्यात बुडली मंत्र्यांच्या ताफ्यानं लाल दिव्यांच्या गाड्यांमधून दुरूनच न्याहाळली स्वत:चे फोटो काढवून घेतले अन् ‘आलबेल’चा संदेश तत्परतेनं दिल्लीला पोचवला. (आलबेल : All Well) – सुभाष नाईक
आला पाऊस पाऊस घुसमटून मेला एकएक mouse छतापर्यंत डुबलं house पुरी फिटली टूरिस्ट पाहुण्याची हौस. (डुबलं : बुडालं) – सुभाष नाईक
सरीवर सरी कोळतायत् गटारांना पूर आलाय् अन् झोपड्यांमधल्या डोळ्यांनाही.. – सुभाष नाईक
आली झड आली झड . काळ्याशार ढगांची झुंड ओततेय् घागरीमागून घागर . तरी भरेना धरतीचं tub जरी बुडलं आगर – सुभाष नाईक
घों घों वारा पावसाचा मारा हिरवं हिरवं वन गरीब माणसांचं मात्र मरण – सुभाष नाईक
Copyright © Marathisrushti.com 1995-2022 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Interpole Technologies | Smart Solutions