इरिगेशनच्या पाटकर्याचे
इरिगेशनच्या पाटकर्याचे धरावे लागतात पाय, शेताच्या पाण्यासाठी नाहीं हो अन्य उपाय ! – सुभाष नाईक
इरिगेशनच्या पाटकर्याचे धरावे लागतात पाय, शेताच्या पाण्यासाठी नाहीं हो अन्य उपाय ! – सुभाष नाईक
एवढंच हवं शेतकर्याला… धान्याला हवा उठाव मोंढ्यावर मिळावा योग्य भाव – सुभाष नाईक
जरी शेतात फार थंडी बा-कडं मागु नका नवी बंडी बा-चं कुडतं पुरतं विरलं आय तर नेसते ठिगळं-ठिगळं – सुभाष नाईक
विहीरीनं म्हटला ‘राम’ आटलं सगळं पाणी थारोळं बिचारं पडलंय् एखाद्या मुडद्यावाणी. – सुभाष नाईक
लोकहो, हा कृषक आहे ऍग्रिकल्चरची सर्वश्रेष्ठ कडी ! भलेही, कर्जामुळे-व्याजामुळे वळू दे त्याची बोबडी ! – सुभाष नाईक
हात हलवला दुरून पाहुन वरून दृष्टी फिरवियली हेलिकॉप्टरनें, ट्रीप पुराची लीडरजींना पुरवियली. – सुभाष नाईक
जलमय झाला परिसर सगळा आभाळातुन पूर दिसे विमानातुनी, नेताजींना पूरग्रस्तांचा नूर दिसे. – सुभाष नाईक
आले कां पत्रकार कोणी ? आले कां रे कॅमेरे ? शेतकर्याचे पुसतो आंसू झटपट घ्या व्हीडिओ ‘खरे’. – सुभाष नाईक
ट्रॅक्टरवर बस, खोटं हस मी फोटो काढतो तो जाहिरातीसाठी धाडतो ; मग भलेही रड ढसाढस. – सुभाष नाईक
नेतेगणहो, तुम्ही ठेवा तुमच्या स्कीम्या तुम्हांनजिक शेतकर्याला, तुमची ‘सेवा’ तापदायकच ठरे खचित. – सुभाष नाईक
Copyright © Marathisrushti.com 1995-2022 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Interpole Technologies | Smart Solutions